आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थिनीने वाचवले सात जखमींचे प्राण, घरच्यांनी रोखूनही ती मदतीला धावलीे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्त्यात अपघात बघण्यासाठी गर्दी झाली होती. घाई असल्याने सलोनीला कुटुंबीयांनी थांबण्याचा सल्ला दिला. तरीही ती कारमधून उतरली. गर्दीत जाऊन बघते तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दांपत्य तिचे मामा-मामीच असल्याचे पाहून थक्क झाली. मग घरचेही धावून आले. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेले. गेल्या १० महिन्यांत 7 जणांचे प्राण वाचवले आहेत.
सलोनी ही एमपी लॉ कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकते. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या राजेश चंचलानी यांच्या व्ही-व्हॉलिंटीयर्स संस्थेसोबत ती काम करते. जखमींना मदत केल्याने आपण पोलिस प्रक्रियेत अडकत नाही, याची तिला संस्थेने माहिती दिल्याने ती न घाबरता गरजूंना मदत करते. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या चौैकात चारचाकीच्या धडकेने जखमी युवकाला सलोनीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गणेशोत्सवाच्या काळात ओंकारेश्वर चौकात दुचाकीवरून पडून जखमी झालेली एक महिला तिच्या मुलीला रुग्णालयात हलवले. २९ ऑक्टोबरला फर्शी फाट्यावर अपघातात ती मदतीला धावली असता अपघातग्रस्त दांपत्य तिचे मामा, मामी आणि चिमुकले भाऊ- बहीणच निघाले.

सलोनीप्रमाणेच मधुसूदन कल्याणकर, सुनील वाघमारे, संजय आचार्य यांनीही वेळोवेळी जखमींची मदत करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. राजेश चंचलानी, गंगापूरचे मनीष वर्मा आणि प्रवीण पारीख यांनी २०१० मध्ये व्ही व्हॉलिंटीयर्सची सुरुवात केली. त्यांना डॉ.सीमा रिसबूड आणि प्राचार्य राजमहेंद्र सावंत यांचे सहकार्य मिळाले.

स्वत:मध्ये बदल करा
^लोक इतरांनामदत करत नाहीत, असा आरोप करण्यापेक्षा स्वत:मध्ये बदल करणे कधीही चांगले. मदत केल्याने आपल्याला त्रास होत नाही. आपणही घाबरता गरजूंना मदत करा. याचे खूप समाधान मिळते. -सलोनी शेलकर पाटील, व्ही- व्हॉलिंटियर्स

जीव वाचवा
^व्ही व्हॉलिंटीयर्सहा संकटातील लोकांनामदत करणारा समूह आहे. अपघातानंतर पोलिस पोहोचण्याची वाट बघता जखमींना मदतीचा हात दिला तर एक जीव वाचू शकतो. यासाठी कायद्याची अडचण नाही. राजेशचंचलानी, संस्थापक, व्ही व्हॉलिंटीयर्स
बातम्या आणखी आहेत...