औरंगाबाद- विश्वसंवाद केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली असून यंदाचा ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांना जाहीर झाला आहे.
युवा पत्रकार पुरस्कार पत्रकार प्रशांत तेलवाडकर यांना जाहीर झाला आहे. विश्व संवादतर्फे या वर्षी ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार जालना जिल्ह्यातील वार्ताहर राजेंद्र कळकटे यांना देण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत केंद्राचे अध्यक्ष कुलभूषण बाळशेटे आणि कार्यवाह मिलिंद पोहनेरकर यांनी दिली.
या पुरस्काराचे वितरण नारद जयंतीच्या दिवशी जून रोजी मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात सायंकाळी वाजता करण्यात येईल. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून इंडिया टुडेचे माजी संपादक जगदीश उपासने उपस्थित राहणार आहेत. या समारंभात दरवर्षी वर्तमानपत्रात सातत्याने पत्रलेखन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येतो. यंदा करमाड येथील पत्रलेखक योगेश चोपडा यांचा सत्कार करण्यात येईल. तसेच पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यंाचाही सत्कार करण्यात येईल, असे बाळशेटे म्हणाले.