आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी समजून घ्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरामधील सर्वच शैक्षणिक व सामाजिक संस्था योग्य शिक्षणाच्या गरजा व त्याचे महत्त्व यावर सखोल निरीक्षणे व परीक्षणे करत असतात. या सर्व प्रक्रियांमधून बदलत्या जगाच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षणाकडेसुद्धा सतत नव्या नजरेने बघण्याची गरज आहे. आपण जेव्हा शिक्षण घ्यायचा विचार करतो आणि त्याचे नियोजनही करायचा प्रयत्न करतो त्या वेळेला शिक्षणाचे चार प्रमुख स्तंभ आपण समजून घेण्याची गरज आहे.
काय शिकतो ते समजून घेणे.
जे समजले त्याप्रमाणे कृती करणे.
समाजामध्ये एकोप्याने राहणे.
निर्णयक्षमता व अडीअडचणींवर मात करण्याचे कसब आत्मसात करणे.
काय शिकतो ते समजून घेणे - मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होऊन सीए होऊ इच्छित असेन तर म्हणजे फक्त.
क्रेडिट, डेबिटच्या एंट्री.
सेल्स अकाउंट्स आणि पर्चेस अकाउंट्सच्या एंट्री
डिप्रेसिएशनची नोंद
कच्च्या मालाच्या साठ्याची किंमत
येणा-या पैशाच्या नोंदी
ट्रायल बॅलन्स
बॅलन्सशीट - नफा-तोट्याचे अंतिम गणित हेच फक्त नसून जे शिकलोय त्याचा उपयोग अर्थपूर्ण रीतीने कशा प्रकारे करता येईल ते पाहणे. म्हणजे जे शिकलो त्यावर कृती करणे.
मी सीए झाल्यावर जिथे नोकरी करणार आहे, तिथे उलाढालीच्या नोंदी करून त्या कंपनीचा वार्षिक ताळेबंद तयार केला. म्हणजे मी फक्त काय शिकलो ते दाखवले. पण या शिक्षणातून मला काय समजलेय ते मात्र कळणार नाही. मला जर खरोखरच सीए म्हणजे काय हे समजले असेल तर मी त्या कंपनीचा ताळेबंद तयार करणारा नोकर होईन का?
माझ्या शिक्षणाचा फायदा समाजामध्ये एकोप्याने राहण्यासाठी उपयोगाचा असेल असे ज्या वेळी मी म्हणतो, त्या वेळेला माझ्या शिक्षणाचा फायदा समाजाला चांगल्या प्रकारे होतो का, याचा विचार करण्याची गरज आहे. एन्रॉनपासून ते भारतामधल्या सत्यम कॉम्प्युटरपर्यंत काम करणा-या सीएंनी तिथले गैरव्यवहार लपवण्यासाठी केलेल्या खोट्या नोंदी किंवा गैरव्यवहार करण्यासाठी केलेल्या खोट्या नोंदी या समाजोपयोगी होत्या का. अशा व्यवहारांमुळे लाखो लोकांच्या आयुष्याची कमाई तर बुडालीच. एखाद्या आॅटोमोबाइल इंजिनिअरने तयार केलेली गाडी तपासताना तिच्यात काही दोष आढळूनही ती तशीच ग्राहकांच्या माथी मारत असल्यास तो एक प्रकारे शिक्षणाचा फायदा करून न देताच लोकांना फसवत नाहीये काय?
निर्णयक्षमता व अडीअडचणींवर मात करण्याचे कसब : कित्येक वेळेला एखादा अशिक्षित माणूस अडीअडचणीत सापडलेला आपल्याला दिसतो. त्या वेळेला आपल्या तोंडातून पटकन निघून जाते, याच्याकडे पुरेसे शिक्षण असते तर त्याला या अडचणी भेडसावल्या नसत्या. शिक्षणाने असे अपेक्षित आहे. माणसाला सारासार विचार करण्याची बुद्धी मिळते व त्याद्वारे निरनिराळ्या अडीअडचणींमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून देते. त्यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन मी एक सुजाण नागरिक होण्यासाठी आहे की पैसे मिळवणारे नुसते मशीन होणारा आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
girish@resumeindia.com