आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Environment Day In Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक पर्यावरण - शिक्षक, शिक्षण दर्जेदार; प्रशासनाचा नाही आधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाने जगभरात ठसा उमटवला आहे. येथील शिक्षक आणि शिक्षणही दर्जेदार आहेत. पण विभागासाठी असलेल अपुरी जागा, अपुरा शिक्षकवृंद आणि प्रशासकीय पातळीवरील उदासीनता यामुळे अनेक मर्यादा येतात. निधीचीही कमतरता असल्याने इच्छा असूनही विभाग या क्षेत्रात हवे तेवढे काम करू शकत नाही. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागाच्या तीन दशकांच्या प्रवासाबाबत...

पर्यावरणाचा ऱ्हास हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन जून १९८५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात खास पर्यावरणशास्त्र विभाग सुरू करण्यात आला. या विभागाने आतापर्यंत ५०० च्या वर पोस्ट ग्रॅज्युएट, तर ६९ पीएचडी संशोधक घडवले आहेत. विभागाने २२ संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून ५२४ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले हेत. हा विभाग केवळ ज्ञानदानातच व्यग्र नसून सामाजिक भान ठेवून समाजातील पर्यावरणविषयक समस्यांवर समाधानही शोधत आहे. एवढा महत्त्वाचा विभाग असूनही पुढील समस्या सोडवण्याबाबत मात्र प्रशासन दुर्लक्ष करते हे दुर्दैव.

जागेची अडचण
मुख्यसमस्या जागेची आहे. सुरुवातीला हा विभाग बॉटनी आणि झुऑलॉजी विभागात चालायचा. १९९४ ला तो सध्याच्या वास्तूत आला. पण जागा अपुरी पडत आहे. विभागाला स्वतंत्र कॉन्फरन्स हॉल नाही. स्वतंत्र प्रयोगशाळाही नाहीत. लेक्चर हॉलमध्ये प्रॅक्टिकल घ्यावे लागतात. नवी इमारत मिळावी यासाठी विभाग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यासाठी प्रशासनाकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

शिक्षकवृंदही कमीच
विभागातएमएस्सीचे दोन वर्ग चालतात. पीएचडीचे संशोधकही आहेत. इथल्या फॅकल्टीचा शहरातील पर्यावरणविषयक कार्यक्रमात, प्रकल्पात सहभाग असतो. पर्यावरणविषयक सेमिनार, कार्यशाळांमध्ये त्यांना मागणी असते. असे असतानाही केवळ चार जणांवरच हा डोलारा उभा आहे. येथे असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरची पदे रिक्त आहेत. नॉन टीचिंग स्टाफही इतर विभागातून मागवण्यात आलेला आहे.

जागतिक दर्जाचा प्रकल्प रखडला
जायकवाडीपरिसरातील जैवविविधता पर्यावरणशास्त्र विभागासाठी महत्त्वपूर्ण आहे. यामुळे या ठिकाणी जागतिक दर्जाचे फिल्ड स्टेशन तयार करण्याचा विभागाचा २००६ पासूनचा प्रस्ताव आहे. यासाठी कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित आहे. या स्टेशनमध्ये लाइव्ह म्युझियम आणि येथील एकूणच माहिती असेल. संशाेधकांनाही येथे काम करता येईल. महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे एकमेव म्युझियम असणार आहे. जपानच्या आय-लेक कंपनीने यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. एकदा का म्युझियम सुरू झाले तर ही कंपनी पुढील निधी देण्यास तयार आहे. पण या कामालाही प्रशासन सहकार्य करण्यास तयार नाही.
रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
पर्यावरणशास्त्रात पीजी केल्यावर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आतापर्यंत येथील ९८ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. काहींनी स्वत:ची कन्सलटन्सी, एनजीओ सुरू केली. उद्योग जगत, कन्सलटन्सी, वनखाते, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण, फॉरेन्सिक लॅब, कृषी खाते, जलसंधारण, पर्यावरण मंडळे अाणि एनजीओसारख्या विविध क्षेत्रात काम करता येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील सद्याचे ७० टक्के कर्मचारी या विभागातील आहेत. २००९ मध्ये एकाच बॅचचे २३ विद्यार्थी मंडळात नोकरीला लागले. विभागाच्यावतीनेही दरवर्षी कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन केले जाते.
पुढील स्लाईडवर पाहा, पर्यावरणासाठी सदैव तत्पर असलेली प्राध्यापक टीम