आज जागतिक पर्यटन दिन आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहराचा नेहमीच गौरवाने उल्लेख केला जातो. अजिंठा-वेरुळ या जगप्रसिद्ध लेण्या याच जिल्ह्यात आहेत, तर यादव कालिन देवगिरी किल्ला औरंगाबाद पासून जवळच आहे. औरंगाबाद शहरातही अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यातील बिबी का मकबरा हे सर्वाधिक लोकप्रिय आहे.
पत्नीच्या प्रेमाखातर शहेनशाहा शाहजहानने आग्र्याला ताज महाल बांधला तर, दुस-या एका शहेनशाहाच्या मुलाने आईच्या प्रेमाखातर ताज महालची प्रतिकृती उभारली. आजही या मातृप्रेमाच्या प्रतिकाला 'दख्खन का ताज' म्हणून संबोधले जाते. बादशाह औरंगजेबाचा मुलगा शहजादा आजमशाह याने आईच्या स्मरणार्थ 'बीबी-का-मकबरा' बांधला. मोगल आणि निझाम स्थापत्यशैलीचा अप्रतिम नमुना असलेला बीबी-का-मकबरा आजही लाखो पर्यटकांना औरंगाबादकडे आकर्षीत करतो.
शहजादा आजमशाहची आई राबिया-उल-दौरानी ही औरंगजेबची आवडती राणी होती. दिलरास बानो बेगम या नावाने ती प्रसिद्ध होती. तिच्या हयातीतच मकबर्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.
पुढील स्लाइड मध्ये जाणून घ्या, कोण होती दिलरास बानो