आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिलादिनी महिलाच ठाणेदार, अमितेश कुमार यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महिलादिनी म्हणजे मार्च रोजी शहरातील १५ पोलिस ठाण्यांचा कारभार महिला पोलिस अधिकारीच हाकणार आहेत. शहर पोलिसांकडून हा वेगळा प्रयोग करून महिलांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आयुक्तालयाच्या हद्दीत १५ पोलिस ठाणी आहेत. त्यापैकी केवळ सिडको पोलिस ठाण्याला महिला पोलिस निरीक्षक आहेत. इतर १४ पोलिस ठाण्यांचा कारभार पुरुष अधिकारी पाहतात. मात्र, महिला दिनाच्या दिवशी या सर्व पोलिस ठाण्यांचा कारभार महिला पाहणार आहेत. ज्या ठाण्यात उपनिरीक्षक पदावर महिला आहेत त्या या दिवशी ठाणेदार असतील. ज्या ठाण्यात उपनिरीक्षक नाहीत त्या ठिकाणी आयुक्तालयातील महिला अधिकारी कारभार पाहतील. शहरात सध्या २६ पोलिस अधिकारी निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावर आहेत.
महिला दिनाची सुरुवात पाच किलोमीटरच्या मॅरेथॉनने करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय समुपदेशानंतर जी जोडपी आनंदाने संसार करीत आहेत त्यांचाही सत्कार या वेळी केला जाणार आहे.