WorldPhotographyDay च्या निमित्ताने आज आम्ही मराठवाड्याचे उदयोन्मुख वाईल्ड लाईफ फोटोग्राफर
श्रीकृष्ण पाटील यांच्या निवडक फोटोंचा नजराणा खास तुमच्यासाठी आणला आहे. श्रीकृष्ण यांच्या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या फोटोंमधील निसर्गाला पक्षांनी दिलेली दिलखुलास दाद पाहायला मिळते. हे पक्षी आपल्या विश्वात मस्तपैकी रमतात, उडतात, बागडतात. त्यांचा तोच स्वभाव जशास तसा श्रीकृष्ण आपल्या फोटोंतून टिपत असतात. उत्कृष्ट रंगसंगती, प्रकाशाचा योग्य वापर आणि वेळेची अचूकता त्यांच्या फोटोतून वारंवार दिसून येते. त्यांचे हे फोटो कोणत्याही फोटोरसिकाला वेड लावणारेच आहेत, त्याच बरोबर ज्यांना फोटोग्राफीची काडीमात्र माहिती नाही अशा लोकांच्याही मनाला भावेल अशी आहे. चला तर मग पाहूयात श्रीकृष्ण पाटील यांनी टिपलेले वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे काही Clicks..
श्रीकृष्ण पाटील यांच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://www.facebook.com/ShrikrishnaPatilPhotography
पुढील स्लाईडवर पाहा, श्रीकृष्ण पाटील यांनी टिपलेल्या पक्ष्यांच्या इतर क्रिडा