आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहांमधील बीभत्स लिखाणाने महिला कर्मचारी धास्तावल्या; महापौर म्हणतात, तुमच्याकडूनच कळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-नगरसेविका, महिला कर्मचारी आणि महिला अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांत मोबाइल क्रमांकासह बीभत्स लिखाण केले जात असल्यामुळे महिला कर्मचारी धास्तावल्या आहेत. बदनामी आणि भीतीपोटी ही कुचंबणा त्या सहन करत आहेत. खुद्द महापौरदेखील या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत.
मनपातील महिला स्वच्छतागृहांतील दरवाजे, भिंतींवर अश्लील चित्रे, कॉमेंट्स आणि मोबाइल क्रमांकही लिहिण्यात आले आहेत. कित्येकदा या स्वच्छतागृहांची रंगरंगोटी झाली; परंतु विकृत मंडळींचे हे उद्योग थांबलेले नाहीत. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी 24 जानेवारी रोजी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील महिला स्वच्छतागृहांची पाहणी केली असता ही बाब समोर आली. पालिकेच्या दोन्ही इमारतींमधील टप्पा क्रमांक 1, 2, 3 मध्ये एकूण 15 स्वच्छतागृहांमधून महिलांची कुचंबणा सुरू आहे. हे कॉमेंट्स वाचून कोणाचीही मान शरमेने खाली जाईल, असा हा प्रकार आहे. महिलांच्या नावासह कॉमेंट्स लिहिल्या जातात. आपले नाव कुठे लिहिले तर नाही ना, हीच भीती महिलांना असते. बदनामी होऊ नये म्हणून कुणाचेही नाव असले, तरी महिला खोडून टाकतात.
या प्रकारामुळे महिलांना स्वच्छतागृहात जाणेही नकोसे झाले आहे. महानगरपालिकेत सुमारे दीडशे महिला कार्यरत आहेत. हे लिखाण करणार्‍या विकृतांना धडा शिकवला जावा, अशी मागणी काही कर्मचार्‍यांनी केली. महिला कर्मचार्‍यांकडे विचारणा केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी हा प्रकार गेल्या दहा ते बारा वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले. ही कुचंबणा सहन न झाल्याने काही महिला तर नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. संध्याकाळी सहानंतर स्वच्छतागृहांचे दार उघडे असते. तेव्हाच असे प्रकार घडत असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. स्वच्छतागृहांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी मागणीही महिलांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
हवी ती मदत करू
महिलांच्या स्वच्छतागृहात असा प्रकार दिसून आला नाही. महिलांनी आमच्याकडे तक्रार करायला हवी होती. ज्या महिलांना त्रास होतोय त्यांची नावे गुप्त ठेवून त्यांना हवी ती मदत करू.
प्रीती तोतला, स्थायी समिती सदस्या
आक्षेपार्ह प्रकार असेल तर आवाज उठवू
महिला कर्मचार्‍यांच्या स्वच्छतागृहातील हा प्रकार मला ठाऊक नाही. असा काही आक्षेपार्ह प्रकार असेल तर आवाज उठवू.
रेखा जैस्वाल, नगरसेविका

पुढील स्लाइडमध्ये, मला तुमच्याकडूनच कळले