आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारातूनच लेखक, प्रकाशक झालो; बाबा भांड यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखक-प्रकाशक बाबा भांड यांचा वरद वाचनालय, गणेश सभेच्या वतीने सत्कार करताना प्राचार्य रा. रं. बोराडे, सुषमा धांडे - Divya Marathi
लेखक-प्रकाशक बाबा भांड यांचा वरद वाचनालय, गणेश सभेच्या वतीने सत्कार करताना प्राचार्य रा. रं. बोराडे, सुषमा धांडे
औरंगाबाद-  बालपणी आईवडील आणि शिक्षकांनी जे संस्कार केले त्यातूनच मी लेखक-प्रकाशक झालो. या संस्कारांचाच परिणाम म्हणजे हा कौतुक सोहळा अनुभवतो आहे, असे प्रतिपादन बाबा भांड यांनी केले. 
 
रविवारी वरद गणेश मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात वरद वाचनालय, गणेश सभा आणि श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दशक्रिया कादंबरीवरील चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल भांड यांचा प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सुषमा धांडे यांनी आशा भांड यांचाही सत्कार केला. 
 
गणेश सभेचे अध्यक्ष चंद्रकांत मुळे, उपाध्यक्ष प्रकाश राशीनकर, सुषमा धांडे यांची उपस्थिती होती. भांड म्हणाले, लहानपणी जे संस्कार होतात, त्यातूनच बालकांमधील सुप्त कलागुणांचा विकास होतो. बालपणी स्काऊट-गाइडचे संस्कारही महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगून त्यांनी दशक्रिया कादंबरीचे कथन केली. प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. मंगेश कुलकर्णी, अश्विनी गोसावी आणि मुलांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक प्रकाश राशीनकर यांनी केले. प्रारंभी जिम्नॅस्टिक कोच राहुल तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके सादर केली. सुभाष तगारे यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. 
 
मी म्हणालो, मला लेखक व्हायचेय... 
भांड म्हणाले, माझे शिक्षण खेड्यात झाले. आई-वडिलांसह शिक्षकांनी वाचनाचे संस्कार केले. वर्गात पुस्तके वाटली जात, काय वाचले याविषयी दुसऱ्या दिवशी दहा-बारा ओळी लिहून आणायला शिक्षक सांगत असत. लेखन-वाचनाचे संस्कार शाळेतच झाले आणि त्याच वेळी लेखक व्हायचे स्वप्न पडू लागले. पुढे सभुला पीयूसीला प्रवेश घेतला. काही जणांनी सांगितले की, हुशार आहेस, विज्ञान शाखेला प्रवेश घे डॉक्टर-इंजिनिअर होशील. मी म्हणालो, मला लेखक व्हायचे आहे. त्या वेळी भालचंद्र नेमाडे, तु. शं. कुलकर्णी, चंद्रकांत भालेराव यांनी लेखनाचे संस्कार केले आणि लेखक-प्रकाशक म्हणून माझी वाटचाल सुरू झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...