आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये ०२ अतिरेक्यांना कंठस्नान, ऑपरेशन एक्स भद्रा यशस्वी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शनिवार. वेळ सकाळी ११ ची. शहरातील प्रमुख रस्ता, उच्च न्यायालयासमोर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये चार अतिरेकी घातपाताच्या कारवाईसाठी दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना कळली आणि पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन तास चालेल्या कारवाईत शीघ्र कृती दलाच्या (क्विक रिस्पॉन्स टीम) ३० जवानांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले, तर दोघांना पकडले. कोणत्याही धोक्याच्या प्रतिकाराला यंत्रणा सज्ज असल्याचे ऑपरेशन ‘एक्स भद्रा’च्या माध्यमातून सिध्द झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे प्रात्यक्षिक आहे, असे कळाल्यानंतर हॉटेलमधील ग्राहकांचा जीव भांड्यात पडला.

अतिरेक्यांनी प्रजासत्ताकदिनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने ग्राहक, हॉटेल व्यवस्थापन अतिरेक्यांनी आपत्तीच्या काळात कशा प्रकारे अतिरेक्यांचा मुकाबला करायचा याचा उत्कृष्ट नमुना सादर केला. क्यूआरटीच्या जवानांनी केलेले प्रात्यक्षिक आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहून काही वेळ हॉटेलमधील वातावरण धीरगंभीर झाले होते. संध्याकाळपर्यंत हॉटेल परिसरात डेमोची चर्चा होती. डेमोसाठी दिल्लीतून रणजित सिंग हे वरिष्ठ अधिकारी आले होते. पोलिस निरीक्षक गौतम पातारे, शिवा ठाकरे, राजकुमार डोंगरे, क्यूआरटीचे पोलिस उपनिरीक्षक राजकुमार पडवी यांनी हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पाडले.

११ वाजेची वेळ
३० जवानांनी अतिरेक्यांना घेरले
०२ अतिरेक्यांना कंठस्नान
०२ अतिरेकी पकडले
देशभर होत आहेत प्रात्यक्षिके
जगभरातहोणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांना कायम तैनात ठेवण्यासाठी देशभरात अशा प्रकारची प्रात्यक्षिके होत आहेत. शाळा, महाविद्यालये, हॉटेल आणि सार्वजनिक स्थळे समाजकंटकांकडून हेरली जातात. अशा वेळी सामान्य नागरिकांनी कुठली भूमिका घ्यावी, यासाठी अशा प्रकारचे डेमो घेतले जात आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.