आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबच्या भावांचा पॅरोलसाठी अर्ज, सध्‍या हर्सूल कारागृहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नुकतीच फाशीची शिक्षा दिल्या गेलेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याचा भाऊ इसा आणि युसूफ मेनन यांनी पॅरोलसाठी गुरुवारी अर्ज दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधिवत प्रक्रियेचे पालन केले गेले नसल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान याकबूच्या भावांचे पॅरोलचे अर्ज आपल्याकडे आला काय, अशी विचारणा विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांना विचारली असता त्यांनी अशा स्वरुपाचा कोणताही अर्ज प्रशासनाकडे आला नसल्याचे सांगितले. याकूबचे हे दोन्ही भाऊ सध्या हर्सूल कारागृहात आहेत.
बातम्या आणखी आहेत...