आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सलीम कुत्तामुळे उद्धवस्त झालो', याकूबच्या भावाने हर्सूलमधील कैद्यांना सांगितले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याकूबचे शव मुंबईत त्याच्या घरी आणण्यात आले तेव्हा लोकांनी गर्दी केली होती. - Divya Marathi
याकूबचे शव मुंबईत त्याच्या घरी आणण्यात आले तेव्हा लोकांनी गर्दी केली होती.
औरंगाबाद - मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनचे दोन भाऊ येथील हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्यांच्यासमवेत जन्मठेपेच्या शिक्षेतील सहा वर्षे व्यथीत केलेल्या व शिक्षा संपून बाहेर आलेल्या शहरातील एका कैद्याशी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने चर्चा केली असता याकूब पेक्षा मोठे असलेल्या या दोघांतील युसूफ नावाच्या भावाच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तो याकूबच काय जगापासून अनभिज्ञ आहे. सर्वात मोठा भाऊ इसा मात्र कारागृहात सामान्य कैद्यांसारखाच वागत होता. परंतु भावाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळाल्यानंतर गेल्या पाच-सहा वर्षांत त्याने अनेक दिवस उपवास केले आहेत. याकूब आणि आम्ही दाऊदचा उजवा हात असलेल्या सलीम कुत्तामुळे अडकलो असल्याचे त्याने सांगितल्याचा दावा या कैद्याने केला आहे.
पाच वर्षांपासून करतो उपवास
बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणजे अतिरेकीच. त्यामुळे खून, दरोडा किंवा अन्य प्रकरणात तुरुगांत अससलेले कैदी अशा कैद्यांशी बोलण्याचा फारसा प्रयत्न करत नाही. परंतु तरीही याकूबचा सर्वात मोठा भाऊ इसा मात्र इतरांमध्ये सहज मिसळतो. त्याचे वागणेही सामान्य कैद्यांसारखेच आहे. काही जणांशी तर तो आपणहून बोलत असे. परंतु पाच वर्षांपूर्वी जेव्हा याकूबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे वृत्त आले तेव्हापासून तो उपवास करत असे. ‘दिव्य मराठी’ला माहिती देणारे कैदी जेव्हा शिक्षा आटोपून बाहेर पडले. तेव्हा अन्य कैद्यांबरोबर त्याच्याशीही भेटले होते. तेव्हा त्याने शुभेच्छाही दिल्या.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सलीम कुत्तामुळे उद्धवस्त झालो
बातम्या आणखी आहेत...