आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Hang On July 30 But His Brother Unknown At Aurangabad

याकूब मेमनच्या फाशीबाबत भावांना कल्पना नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्याची तयारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंतिम टप्प्यात आली असली तरी त्याबाबत हर्सूल कारागृहात असलेल्या त्याच्या दोघा भावांना अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.


इसा आणि युसूफ हे याकूबचे दाेघे लहान भाऊ २००७ पासून मुंबई बाॅम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्याच्यासोबत ते पाकिस्तानला गेले होते. हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. युसूफच्या मनावर परिणाम झाला असून तो कायम आत्ममग्न असतो, विचारलेल्या प्रश्नांची असंबद्ध उत्तरे देतो. इसाचे वर्तन मात्र सामान्यांसारखे असते, असे हर्सूल कारागृहात राहून आलेल्या काही आरोपींनी सांगितले. याकूबला टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले आहे एवढीच या दोघांनाही माहिती आहे. कारागृहात वर्तमानपत्रे, टीव्हीही असतो. या माध्यमातून त्यांना याकूबला फाशी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली असण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृतपणे त्यांना सांगण्यात आले नाही. अनेक दिवसांपासून त्यांना कारागृहात भेटायला कोणी आलेले नाही, असे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले. जेल प्रशासनाशी निगडित असलेल्या बातम्या कापून नंतरच वर्तमानपत्रं कैद्यांना वाचायला दिले जाते. जेल प्रशासनाबाबत कुठलीही माहिती कैद्यांपर्यंत पोहाेचू नये हा प्रयत्न असतो. त्यामुळे इसा आणि युसूफला फाशीची कल्पना वृत्तपत्रातून मिळणे कठीण आहे.

तशी पद्धत नाही
कैद्यांच्या नातेवाइकांपर्यंत कुठल्याही घटनेची माहिती पोहाेचवली जात नाही. तशी पद्धत नाही. त्यामुळे युसूफ, इसाला याकूबच्या फाशीबाबत सांगण्यात आले नाही.
- विनोद शेकदार, अधीक्षक, हर्सूल कारागृह.