आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashashri Bakhariya Is Smallest Corporator In Aurangabad

यशश्री सर्वांत तरुण नगरसेविका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नवख्या अपक्ष उमेदवार यशश्री बाखरिया या राजाबाजार वॉर्डातून विजयी झाल्या आहेत. त्या केवळ २१ वर्षांच्या आहेत. सर्वात कमी वयात नगरसेविका होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. त्या सध्या बीएस्सीचे शिक्षण घेत असून परीक्षेच्या काळातही त्यांनी प्रचार सुरूच ठेवला.
बाखरिया यांना २५४८ मते मिळाली. तरुण मुलामुलींनी राजकारणात आल्याशिवाय विकास होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राजाबाजारचे नगरसेवक जगदीश सिद्ध यांच्या वहिनी रिना सिद्ध यांनी या वॉर्डात भाजपकडून निवडणूक लढवली. त्यांना १९८२ मते मिळाली.