आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Year 2013 14 Mahatma Gandhi Tantamukt Gav Patrakarita Puraskar To Bharat Hiwrale.

भरत हिवराळे यांना शासनाचा पुरस्कार, पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्या हस्ते गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दैनिक "दिव्य मराठी'चे उपसंपादक भरत सूर्यभान हिवराळे (रा. बोरगाव, ता. पैठण) यांना राज्य शासनाचा वर्ष २०१३-१४ चा "महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार' २६ जानेवारी रोजी प्रदान करून गौरवण्यात आले.
या वेळी पोलिस अधीक्षक (औरंगाबाद ग्रामीण) नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, पाेलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर, महिला पोलिस नाईक अनिता रघू आदी उपस्थित होते. हिवराळे यांनी तंंटामुक्त गाव मोहीम प्रभावी व यशस्वीरीत्या राबवण्यामध्ये पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वर्ष २०१३-१४ मध्ये वस्तुनिष्ठ प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे त्यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला. २५ हजार रुपये, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याबद्दल हिवराळे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत अाहे.
दिव्य मराठीचे उपसंपादक भरत हिवराळे यांना "महात्मा गांधी तंटामुक्त गाव पत्रकारिता पुरस्कार' देऊन गौरवताना पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक सुनील लांजेवार.