आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yes, We Used Side Margin Place And Built Restaurant In Parking

होय, साइड मार्जिनची जागा वापरली, पार्किंगच्या जागेत रेस्टॉरंटही बांधले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आम्हीइड मार्जिनची जागा वापरली, पार्किंगच्या जागेतही रेस्टाॅरंट बांधले, अशी कबुली राका लाइफस्टाइलचे विकासक, संचालक सुनील राका यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. हे अतिरिक्त बांधकाम आम्हीच पाडले असा दावाही त्यांनी केला. दुसरीकडे राकांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून मनपाच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण ठेवले अतिशय कमकुवत पंचनामा केल्याचे समोर आले अाहे. या प्रकरणात अधिकारी ज्या तऱ्हेने वागत आहेत ते पाहून महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोडही हताश झाले आहेत. दरम्यान, राका लाइफस्टाइलने नियमबाह्य बांधकाम करीत त्यांना दिलेल्या जागेपेक्षा तब्बल दोन हजार चौरस फूट जागा बेकायदा वापरल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी ज्योतीनगरसारख्या अतिउच्चभ्रू वसाहतीत राकामध्ये सुरू असलेल्या उर्वरितपान
हुक्कापार्लरवर धाड टाकली होती. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी कानपिचक्या दिल्यावर महापौर, उपमहापौरांनी मनपा आयुक्त प्रकाश महाजनांसोबत शनिवारी पाहाणी केली तेव्हा तर वरच्या मजल्यावर खुलेआम मसाज पार्लर सुरु होता. शिवाय महिलांच्या पार्लर कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचेही आढळले. महिलांच्या कक्षात पुुरुष कर्मचारी काम करत होते. ते पाहून आयुक्तांनी आदेश दिले. शनिवारी रात्री उशिरा क्लब सील करण्यात आले.

दहा बारा जणांनी केली विचारपूस
राका क्लबला सील केल्यानंतर सोमवारी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत दहा बारा क्लबच्या सदस्यांनी येऊन विचारपूस केली. येणा ऱ्या सदस्यांना माहिती देण्यासाठी सँडी नावाच्या सुरक्षा रक्षकाला क्लबच्या बाहेर तैनात करण्यात आले होते. क्लबची संख्या हजारोच्या घरात असून यात काही अजीवन सदस्यत्व स्विकारलेले असल्याचे समोर आले. त्यांच्याकडून फिस पोटी लाखो रुपये घेतल्याचेही समोर आले.

महापौरांना खबरच नव्हती
आज सोमवारी महापौर, उपमहापौरांनी यांनी बीओटीचे कक्षप्रमुख, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना बोलावून घेतले. आतापर्यंत राकांविरुद्ध पोलिसांत तक्रार का दिली नाही. यापूर्वी स्थळपाहणी का केली नाही, अशी सरबत्ती केली. त्यावर अली यांनी आपण तत्काळ कारवाई केली असे म्हणत तेथील बेकायदा बांधकाम हटवले, सील लावले असे म्हटले. महापौरांनी नंतर विधी सल्लागार ओ. सी. शिरसाट यांनाही बोलावले. ते आले तेव्हा त्यांच्याकडे राका यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची प्रत होती. तोपर्यंत राका न्यायालयात गेले आहेत याची खबरबात महापौरांना नव्हती.

सब लिखा है उसमें
महापौर अली यांच्याकडे पंचनाम्याची प्रत मागत होते. त्यात मसाज पार्लर इतर बाबींचा उल्लेख आहे का असे वारंवार विचारत होते. त्यावर अली यांनी सब लिखा है उसमे.. कुछ भी नही छोडा असे सांगत होते. प्रत्यक्षात राकांच्या याचिकेत मनपाच्या पंचनाम्याची प्रत होती. त्यात ना मसाज पार्लरचा उल्लेख होता ना बेकायदा बाबींचा उल्लेख. राका यांच्या याचिकेची उद्या सुनावणी होणार असून याचिकेत त्यांनी मनपाने सील लावण्याची केलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत मनपाने नोटीस देता कारवाई केल्याने आपण बेकायदा बांधकाम आपणहून हटवल्याने सील काढावे अशी मागणी केली आहे.

मनपाच्या पंचनाम्यात "राका'च्या विकासकाने अतिक्रमण काढल्याचे म्हटले आहे. मात्र, महापालिकेच्या पथकानेच जुलै रोजी अतिक्रमण काढले, असे सांगणारी छायाचित्रेही मनपानेच प्रसारमाध्यमांकडे पाठवली होती.

पंचनामा थातूरमातूर
सहायकअभियंता एस. एस. रामदासी यांनी केलेल्या पंचनाम्यात म्हटले आहे की, जुलै रोजी केलेल्या स्थळपाहणीत भोगवटा प्रमाणपत्राच्या नकाशात दर्शवलेल्या पार्किंग साइड मार्जिनवर अतिक्रमित बांधकामे केल्याचे निदर्शनास आले. या अतिक्रमित बांधकामंाचा वापर संगीत वर्ग, हुक्का बार, पूल टेबल या व्यवसायासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा पंचनामा करण्यात आला. दर्शनी बाजूला १४ बाय मीटरच्या जागेत पत्र्याचे छत टाकून हाॅटेलसाटी वापर, उत्तर दक्षिणेच्या साइड मार्जिनवर अनुक्रमे १८ बाय मीटर बांधकामात पूल टेबल, १२.५ मीटर बाय ४.५ मीटरमध्ये हाॅटेल, दर्शनी गेटसमोरील वाहनतळात बार ४.७५ मीटर जागेत संगीत वर्ग, पहिल्या मजल्यावर दक्षिणेस ८.२५ मीटर बाय मीटर जागेत पत्र्याचे छत टाकून डान्स क्लब आदी बाबींचा त्यात समावेश आहे. हे अतिक्रमित पत्र्याचे शेड सीलिंगसह बांधकामे विकासक स्वत:हून काढून घेत आहेत, असे त्यात म्हटले आहे.

राका लाइफ स्टाइलचे संचालक सुनील राका यांनी आज ‘दिव्य मराठी'शी बोलताना आपण सगळे परवानग्या घेऊनच केल्याचे सांगितले. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे अशी..
प्रश्न : तुम्हीदिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा वापरली. साइड मार्जिन वापरली का ? राका: हो.पण आम्ही ते बांधकाम आता काढले आहे.
प्रश्न: तुम्हीन्यायालयात जाणार काय? राका: नाही.अजून निर्णय झालेला नाही.
प्रश्न: अहो,तुम्ही याचिका केली आहे ना? राका: नाही.आम्ही तयारी करीत होतो. पण लगेच सुनावणी असेल हे माहीत नव्हते. तुम्ही म्हणताय म्हणजे दाखल झाली असेल.
प्रश्न : नियम मोडून पार्किंगच्याजागेत रेस्टाॅरंट बांधले होते का? राका: हो.आम्ही पार्किंगच्या जागेत बांधकाम केले. पण आपणहून ते काढून घेतले आहे.
प्रश्न : तुम्हीकायदा धाब्यावर बसवला. राका: याप्रकरणात आमची बाजू लोकांसमोर यायला हवी. तेथे गैरप्रकारासारखे काहीही नाही.
प्रश्न: मसाजपार्लरचे काय? राका: आमच्याकडेपरवानगी आहे. तेथे सुरू करण्यात आलेल्या अॅमिनिटीजची परवानगी आम्ही मनपाकडून घेतली आहे. त्यात मसाजचाही समावेश आहे.