आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही पाहून शिकल्या योगा; आज घालतात तब्बल ४०० सूर्यनमस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वीस वर्षे योगाभ्यासातून कमावलेल्या शक्तीने शहरातील एक महिला एका दमात चक्क चारशे सूर्यनमस्कार घालते. त्यांचे नाव आहे मंजू यतीन ठोले. सिडको परिसरात राहणाऱ्या मंजू यांचे जीवनच योगाने भारावलेले आहे. टीव्ही पाहून मंजू योगा शिकल्या, पण आज योग अभ्यासात त्या पारंगत झाल्या आहेत.

जागतिक योग दिनानिमित्त मंजू दरवर्षी सिडको एन-३ भागातील नागरिकांसाठी उद्यानात मोफत पाॅवर योगा शिबिर घेतात. यात योगासह प्राणायाम आणि सूर्यनमस्कारही त्या शिकवतात. सुरुवातीला त्या पंधरा ते वीस सूर्यनमस्कार घालत असत. हळूहळू योगसाधनेतून वेळ काढत त्यांनी सूर्यनमस्कार वाढवण्यास सुरुवात केली. वीसवरून पन्नास अन् पन्नासवरून शंभर आणि सहा महिन्यांत चारशेवर हा आकडा पोहोचला. सूर्यनमस्कार हा प्रकार म्हणजे पुरुषांची मक्तेदारी असलेला समजला जातो; पण मंजू यांच्या मते महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीनेच सूर्यनमस्कार घालू शकतात. गरज आहे ती फक्त सातत्याची, असे त्या म्हणाल्या.

सहा महिन्यांत चारशेचा पल्ला
मंजूया मूळच्या बीड जिल्ह्यातील उमापूर या छोट्याशा गावातल्या. त्यामुळे शालेय जीवनापासून त्यांना कबड्डी अन् खो-खोची आवड. अॅड. यतीन ठोले यांच्याशी लग्न झाल्यावर त्यांनी औरंगाबादला पाॅवर योगाचे प्रशिक्षण १९ वर्षांपूर्वी घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी जी लवचिकता त्यांच्यात होती, ती आज ४४ व्या वर्षीही त्यांच्यात दिसते.
छायाचित्र: शिबिरात मंजू ठाेले (मध्यभागी) पॉवर योगाचे प्रशिक्षण देतात.
बातम्या आणखी आहेत...