आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलतरण तलावात पाण्यावर योगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाण्यावर योगासनांचे अनेक प्रकार करता येतात आणि त्यामुळे शरीरावर मोठा बदल घडू शकतो, हे शनिवारी अनेकांनी पाहिले. जागतिक योग दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील जलतरण तलावात सकाळी 7 ते 8 या वेळेत ३० जणांनी विविध योगासने करून दाखवली.
पाण्यावर गरुडासन, पद्मासन, मत्स्यासन, शीर्षासन, मंडुकासन, उष्ट्रासन, ताडासन, वृक्षासन, पश्चिमोत्तानासन अशी विविध आसने करण्यात आली. प्राणी आणि पक्ष्यांची बैठक स्थिती जशी असते त्याप्रकारची योगासने या वेळी करण्यात आली. पाण्यातील योगासनांचा प्रचार आणि प्रसार झाला नसल्याने अनेकांना याविषयी माहिती नाही.
प्रामुख्याने श्वसनावर जे योगप्रकार केले जातात ते पाण्यावरही करता येतात. ज्या व्यक्तींना मणकेदुखी, गुडघेदुखी, कंबरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी पाण्यातील योगासने अत्यंत फायदेशीर ठरतात. कारण जमिनीवर योग करताना जेवढी हालचाल होत नाही त्यापेक्षा जास्त हालचाल पाण्यात होते. सततच्या सरावाने या योग प्रकारात स्थिरता निर्माण होते. पाण्यातील योगात बाह्यकुंभ (पाण्याबाहेर श्वास रोखून ठेवणे) आणि अंतर्कुंभ (शरीरात श्वास रोखून ठेवणे) या प्रकारांमध्ये योग शिकवला जातो. हा योग प्रकार नवीन असला तरी अनेक जण या योगाचे फायदे घेत आहेत. या वेळी मधुकरअण्णा वैद्य, अभय देशमुख, विठ्ठल पाटील, तुपकरी यांची उपस्थिती होती.
२५ वर्षांपासून सराव
- मी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने या पाण्यावरील योग प्रकाराचा सराव करतो आणि विनामूल्य शिकवतो. आजपर्यंत दोन हजारांवर प्रशिक्षणार्थींना हा योगा शिकवला आहे. पोहण्याला जर योग आणि प्राणायामची साथ दिली, तर स्ट्रेंथ वाढण्यास मदत होते.
भगवान महादू माळी, योग शिक्षक
बातम्या आणखी आहेत...