आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Boy Death In Railway Accident At Aurangabad

रेल्वेखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू; आत्महत्या की अपघात?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मित्राकडे पुस्तक आणण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडलेल्या एलएलबीच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणार्‍या महेंद्र कचरू साळवे (30) या विद्यार्थ्याचा मृतदेह म्हाडा कॉलनीजवळील रेल्वे रुळावर आढळला. ही घटना मंगळवारी दुपारी 4 च्या सुमारास घडली.

दरम्यान, महेंद्र बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तो बीड बायपास रोडवरील जलजिरा हाउसिंग सोसायटीत राहत होता. महेंद्र नापास झाला होता. तो परीक्षेची तयारी करीत होता. त्यासाठी मंगळवारी दुपारी मित्राकडे पुस्तक आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, जवाहरनगर पोलिसांना रेल्वेखाली सापडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी नातेवाइकांचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याने आत्महत्या केली की रेल्वेखाली सापडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.