आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपत्ता युवकाचा खून; व्यवसायातील स्पर्धेमुळे जवळच्या मित्रानेच काढला काटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बजाजनगर मधील अमोल भगवान भाले या बावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे शुक्रवारी (15 फेब्रुवारी) उघडकीस आले. त्याचा मृतदेह नगर जिल्ह्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. इंटरनेट कॅफेच्या व्यवसायातून निर्माण झालेल्या स्पर्धेतून जवळच्या मित्रांनीच अमोलची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

अमोल भाले बजाजनगरमधील त्रिमूर्ती चौकात पंचगंगा सोसायटीत राहत होता. बजाजनगरमध्येच त्याचा इंटरनेट कॅफेचा व्यवसाय होता. शनिवारपासून (9 फेब्रुवारी) तो बेपत्ता होता. त्याच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिस शोध घेत होते. दरम्यान, रविवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर बायपासजवळ एका युवकाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. नगर पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना बजाजनगरमधील युवक बेपत्ता असल्याचे समजले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कपडे व अंगठीच्या साहाय्याने अमोलच्या नातेवाइकांनी ओळख पटवली.

अमोल काही वर्षापूर्वी बजाजनगरातील उदय इंटरनेट कॅफेचा चालक नामदेव देवकर (26, रा. रामराई ता. गंगापूर) याच्याकडे काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी अमोलने नोकरी सोडून स्वत:चे साई इंटरनेट कॅफे सुरू केले. दोन्ही कॅफे एकाच जयभवानी चौकात असल्यामुळे नामदेवच्या कॅफेवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळेच नामदेवने सहकारी संदीप दिवटे (27, रा. बजाजनगर) व संदीप देवकर (27, रा. रामराई) यांच्या साथीने अमोलचा क ाटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

देवदर्शनाचे निमित्त

तिन्ही आरोपींनी शनिअमावास्येच्या निमित्ताने देवदर्शन करण्यासाठी म्हणून अमोलला क ारने (एमएच 21 व्ही 4876) नेले. त्यानंतर अमोल घरी परतलाच नाही. आरोपींनी त्याला थेट नगर जिल्ह्यात नेऊन त्याची हत्या केली आणि वाळुंज (जि. नगर) शिवारात पेटवून दिले. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नगर पोलिसांना या बेवारस मृतदेहाविषयीची माहिती मिळाली व त्यांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला .

आरोपी पोलिसांच्या जाळ्यात : मृतदेह अमोलचाच असल्याची खात्री पटताच वाळूज एम.आय.डी.सी.ठाण्याचे निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक अनिल कुरुजकर व त्यांच्या सहकार्‍यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी व्यावसायिक स्पर्धेमुळे अमोलचा क ाटा क ाढल्याची कबुली दिली आहे. आरोपींना पुढील तपासासाठी नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असून अधिक तपासानंतर खून नेमका कसा केला याची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले.