आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल नेटच्या खांबाला दोरी बांधून तरुणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - फुटबॉल खेळासाठी रोवलेल्या नेटच्या खांबाला नायलॉन दोरी बांधून २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. कर्णपुरा परिसरातील जॉगिंग ट्रॅकजवळील मैदानावर गुरुवारी पहाटे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. विजय कारभारी वाघ (२२, रा. बनेवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
विजय मूळचा बोधेगाव येथील आहे. तो काही दिवसांपासून शहरात कामाच्या शोधात आला होता. यापूर्वी काही महिने त्याने इलेक्ट्रिकचे काम केले. बुधवारपासून तो एका खासगी ट्रॅव्हल्स बसवर क्लीनर म्हणून कामही करणार होता. मात्र, गोव्याला जात असल्याचे सांगून विजय बुधवारी रात्री घराबाहेर पडला. पहाटे पाच वाजता आरटीओ कार्यालय परिसरातील मोकळ्या मैदानावर विजय फुटबॉल नेटच्या खांबाला लटकलेला आढळून आला. घटनेची माहिती कळताच छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विजयचे वडील गावाकडे शेती, तर भाऊ इलेक्ट्रिकचे काम करतो. हेडकॉन्स्टेबल मुश्ताक शेख तपास करत आहेत.

गर्दी पाहून थांबला नि भावाचा मृतदेह दिसला
विजयचा मावसभाऊ पहाटे कामावर निघाला असता अयोध्यानगरीसमाेरील वॉकिंग प्लाझाच्या शेजारी असलेल्या मैदानावर त्यांना गर्दी दिसली. त्यामुळे हे पाहण्यासाठी ते तेथे गेले असता त्यांना मावसभाऊ विजयच लटकलेला दिसला. बुधवारीच विजय गावाकडे जाऊन वडिलांना भेटून आला होता. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...