आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निंबायती तांडा येथे शेतकरीपुत्राची विष घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- वडिलांकडे बँकेचे दोन लाख कर्ज, त्यात पावसाने दगा दिल्याने दुबार पेरणी कशी करावी,या विवंचनेत असलेल्या शेतकरीपुत्राने सासुरवाडी निंबायती तांडा येथे रविवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. सुनील नामदेव चव्हाण (२५, रा. चबुतरा, ता. पारोळा, जि. जळगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी सोयगाव पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनील चव्हाण हा निंबायती तांडा (ता. सोयगाव) येथे सासरे किसन राठोड यांच्याकडे आला होता. त्या वेळी त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...