आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगा‍बाद शहरात लग्नाला विरोध असलेल्या युवतीने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आई, वडील लग्नाची घाई करत असल्याने नैराश्य आलेल्या तरुणीने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रामनगर, मुकुंदवाडी भागात घडली. सुश्मिता विनोदकुमार भारुका (27) असे या युवतीचे नाव आहे.


सुश्मिता बी. कॉम. झाल्यानंतर दोन वर्षे एका कंपनीत नोकरीस होती. सध्या ती काही महिन्यांपासून घरीच होती. तिचे वडील डॉक्टर आहेत. आठ दिवसांत तिला चार ते पाच स्थळे आली होती. मात्र, भावाचे लग्न झाल्यानंतरच आपण करणार, असा तिने निर्धार केला होता. कुटुंबीयांनीदेखील तिचे म्हणणे ऐकले. मंगळवारी दुपारी जेवण आटोपल्यानंतर आजारी असलेली सुश्मिता आराम करण्यासाठी घराच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीत गेली. सायंकाळचे सहा वाजले तरी ती खाली आली नाही म्हणून तिच्या आईने मोबाइलहून संपर्क साधला. मोबाइल उचलत नसल्यामुळे आईला शंका आली आणि त्यांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली. दरवाजा उघडून आत प्रवेश करताच ती फासावर लटकलेली दिसून आली. आई-वडिलांनी तिचा मृतदेह घाटीत नेला.

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात सुश्मिताने मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती पडले आहे. आपल्या मृत्यूला कोणासही कारणीभूत धरू नये, असे तिने नमूद केले आहे. तिच्या अकस्मात मृत्यूची नोंद मुकुंदवाडी ठाण्यात करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक व्ही. ए. तांदळे आणि सहायक फौजदार जी. आर. राठोड करत आहेत.