आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या देवळाई परिसरातील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- देवळाई परिसरातील वन विभागाच्या उद्यानासमोरील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. राहुल सखाराम कपाळे (२०, रा. रमाबाईनगर, मुकुंदवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजता राहुल दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. तलावातील खड्ड्यात त्याचा पाय अडकला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे हवालदार के.बी. लुटे, आर.एस. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत राहुलला उपचारासाठी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...