आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑसी १० सर करणारे युवा पोलिस पोलिस बहाद्दर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे महाराष्ट्र पोलिस दलाचे दिनेश राठोड, तारकेश्वरी भालेराव यांच्यासह तब्बल भारतीयांनी विमान १४ हजार फूट उंचीवर असताना चित्तथरारक फ्री फॉल जंप केले. अर्थात पाठीवर पॅराशूट होते. पण ते पॅराशूट जमीन जवळ आल्यावर समयसूचकता दाखवत सावकाशपणे उतरण्यासाठी थोड्या वेळ आधी उघडावे लागते.

यापूर्वी दिनेश तारकेश्वर यांनी बारामती येथे पाच हजार फुटांवरून स्काय डायव्हिंग केले होते. पॅराशूट जंप करणारे महाराष्ट्र पोलिस दलात हे दोघे पहिलेच ठरले. दिनेश हे मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील. सध्या पुणे शहर पोलिस दलात आहेत. पोलिस उपायुक्त तांबडे, वारजे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

तब्बल १४ हजारफूट उंचीवरून केले चित्तथरारक फ्रीफॉल
तब्बल १४ हजार फूट उंचीवर विमानात तुम्ही आहात आणि तेथून जमिनीवर खाली उडी ठोकायची. केवळ उडी मारायची नाही, स्काय डायव्हिंग म्हणजे वेगाने खाली जमिनीकडे येताना फ्री फॉलचा चित्तथरारक अनुभवही घ्यायचा. काय खायचं काम आहे का गड्या. नाही नं म्हणूनच तर यात वेगळेपण आहे. खोल नदीवरील लोखंडी पुलावरून रेल्वे जाताना आपण खिडकीतून बाहेर पहातानाही आपले डोळे फिरतात. हात गजावर गच्च पकडले जातात. डोळे विस्फारून आपण विचार करतो, येथून पडलो तर ? रेल्वे आपल्याच गतीत असते. आपण त्या अनुभवालाही किती अनोखे मानतो.

दहा सर्वोच्च शिखरेही केली पादाक्रांत
ऑस्ट्रेलियाखंडातील दहा सर्वोच्च शिखरे महाराष्ट्र पोलिस दलातील गिर्यारोहक दिनेश तारकेश्वरी यांनी सर केली. या शिखरांवर राष्ट्रीय ध्वजाबरोबर महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज फडकाविला. या खंडातील दहा सर्वोच शिखरांना ऑसी १० असे म्हटले जाते. हे आव्हान पेलणाऱ्या प्रथम भारतीयांमध्ये दिनेश तारकेश्वरी यांचा सहभाग आहे. सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेसह दहा भारतीयांनी एका वेळी ही मोहीम फत्ते केली. सुरेंद्र शेळके यंाच्या मार्गदर्शनाखाली आनंदने या भारतातील या प्रथम मोहिमेची आखणी केली होती.