आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Young Student Crete Engineering Admission Website

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणाने बनवले अभियांत्रिकी प्रवेशाचे संकेतस्थळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा म्हटले तर पाल्याबरोबर पालकांची डोकेदुखी वाढते. कोणत्या महाविद्यालयात आणि कोणत्या शाखेला प्रवेश मिळतो याची कुटुंबीयांनाही उत्सुकता असते.
याच त्रासदायक प्रक्रियेतून गेलेल्या अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रवेशाची स्थिती दर्शवणारे संकेतस्थळ तयार केले आहे. सीईटीचे गुण नोंदवले की, आता घरबसल्या प्रवेशाबाबतची माहिती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अभियांत्रिकी प्रवेश अधिक सोपे आणि सुटसुटीत करण्याचे काम धावणी मोहल्ला येथे राहणार्‍या हर्षल जैन आणि त्याच्या दोन मित्रांनी केले आहे. हर्षलचे शिक्षण माहिती तंत्रज्ञान विषयात झाले असून (सीओईपी) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून त्यांनी बीटेक केले आहे.
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया किती क्लिष्ट असते याचा अनुभव त्यांनी प्रवेशाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथील गिरीश चौधरी, प्रदीप चौधरी आणि हर्षलने सर्वांना प्रवेशाची स्थिती घरबसल्या कळावी म्हणून संकेतस्थळ निर्माण केले आहे. whatnextplus.com या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला रँक अथवा सीईटीचे गुण नोंदवयाचे आहेत. त्यानंतर प्राप्त रँकमध्ये कोणत्या महाविद्यालयात आणि कोणत्या विषयाला प्रवेश मिळू शकतो, याची माहिती उपलब्ध होईल. या तिघांनी मे-2011 मध्ये हे संकेतस्थळ तयार करण्यास सुरुवात केली आणि अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी हे संकेतस्थळ सुरू केले.