आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास अटक, शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आणि गुजरातेत नेऊन तिचा गर्भपात करणाऱ्या आरोपीला मंगळवारी (२६ सप्टेंबर) अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारपर्यंत (२९ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. बहिरवाल यांनी दिले. याप्रकरणी हर्सूल परिसरातील ६२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली होती.
 
त्यानुसार फिर्यादीची मुलगी ही खासगी कंपनीत नोकरी करते. २५ सप्टेंबर रोजी ती कामासाठी बाहेर पडली. फिर्यादी कामानिमित्त टीव्ही सेंटरकडे जात असताना त्याला त्यांच्या मुलीची दुचाकी पडलेली दिसली. फिर्यादीने कंपनी मित्रांकडे शोध घेतला असता मुलगी कंपनीत आली नसल्याचे कळले. 

याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दिलेल्या जबाबानुसार आरोपी गणेश रंगनाथ गवते (४०, रा. गुजरात) याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला दिवस गेल्यानंतर आरोपीने तिला सुरत येथे नेऊन गर्भपात केला होता. २५ सप्टेंबर रोजी आरोपीने तिला धुळे येथे धमकी देऊन नेले होते. मात्र त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपीने मुलीला घरी आणून सोडले होते. आरोपीला कोर्टात हजर केले असता सुरतमध्ये करण्यात आलेल्या गर्भपाताचा सखोल तपास करणे बाकी असून आरोपीने पीडित तरुणीला ज्या वाहनातून नेले ते वाहन जप्त करणे बाकी आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील सय्यद शेहनाज यांनी कोर्टात केली. ती कोर्टाने मान्य केली. 
बातम्या आणखी आहेत...