आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दोन वर्षे बलात्कार करणा-या तरुणाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर दोन वर्षे बलात्कार करणा-या अभिषेक परिहार या तरुणाला एमआयडीसी सिडको पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. तो शहरातील
एका बड्या मिठाईवाल्याचा नातेवाईक असल्याचेही समजते.

लग्नाच्या आणाभाका घेऊन आरोपी अभिषेकने तरुणीवर ५ डिसेंबर २०१३ पासून शारीरिक संबंध ठेवले होते. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर आरोपी अभिषेकने लग्नास नकार दिला. ही तरुणी सिकंदराबादची असून तिने थेट पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.