आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नारेगाव परिसरातील पाॅवरलूम येथील ज्ञानेश्वर पंढरीनाथ खराटे (३२ ) या तरुणाने रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्वर अविवाहित होता. तो मोलमजुरीची कामे करत होता. आई आजारी असल्याने ती बहिणीकडे आहे. घरी लहान भाऊ, वडील आणि ज्ञानेश्वर असे तिघेच राहायचे. वडील रात्रपाळीला तर भाऊ दवाखान्यात नोकरीला गेला असता ज्ञानेश्वर याने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतला. त्याचा लहान भाऊ रात्री कामावरून परतला तेव्हा ही घटना उघडकीस आली. तपास पोलिस नाईक अर्शद शेख करीत आहेत.
तीन वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू
शूलिभंजन परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील तीन वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. विशाल किशोर मोरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. विशाल सकाळी १० वा. खेळण्यासाठी घराबाहेर गेला. तो घराजवळील तलावात पडल्याचे कळताच कुटुंबीयांनी बेशुद्धावस्थेत त्याला घाटीत आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नातेवाइकांनी शवविच्छेदन करताच मृतदेह घरी नेला. ही माहिती घाटी चौकीतील कर्मचाऱ्यांनी खुलताबाद पोलिसांना दिली. त्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेह पुन्हा घाटीत आणून शवविच्छेदन केले.
बातम्या आणखी आहेत...