आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Committed Suicide In Davarwadi, Farmer Consume Poision

दावरवाडीत तरुणाची आत्महत्या, शेतक-याने घेतले विषारी द्रव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील ३० वर्षीय तरुणाने नशेत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, तर याच गावातील ७० वर्षीय शेतक-याने नैराश्यातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.दावरवाडी येथील सोपान आसाराम काळे (३०, रा. दावरवाडी) याने मद्यपान करून गुरुवारी राहत्या घरी पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. सायंकाळी शेजारी व त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी हा प्रकार पाहिला, तर दुस-या घटनेत धोंडिराम चांदूजी दिवटे यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यांची दावरवाडी शिवारात जमीन असून भूविकास सहकारी सोसायटीकडून १४ हजार १०० रुपयांचे कर्ज घेतले होते, तर घेतलेले कर्ज नुकतेच फेडले होते. मात्र, कापसाने दगा
दिल्याने शेतीवर झालेला खर्चही पदरात पडला नाही, त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते.
याला कंटाळून त्यांनी गुरुवारी कुणालाच न सांगता शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले.
सायंकाळ झाली तरी वडील घरी न आल्याने काळजीत पडलेल्या मुलांनी शेतात जाऊन वडिलांचा शोध घेतला असता ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने प्रथमोपचारांसाठी पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती िचंताजनक असल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.