आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित तरुणीवर अत्याचार 10 वर्षांची सक्तमजुरी, बाळाचा पिता सिद्ध करण्यात डीएनए अहवाल महत्त्वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कपडे धुण्याची पावडर विकणाऱ्या दलित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या संतोष रायसिंग चव्हाण (रा. राणी उंचेगाव, ता. घनसावंगी) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यात डीएनएचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरला.
 
शक्तिनगर येथील कपडे धुलाई पावडरच्या मार्केटिंग कार्यालयात काम करणारी ही २४ वर्षीय तरुणी पावडर विक्रीसाठी सिडको भागात गेली होती. संतोष तिला पावडर खरेदी करतो, असे म्हणत हर्सूल कारागृह परिसरातील एका कॉलनीतील घरात घेऊन गेला. तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला.
 
त्यानंतरही त्याने तिच्यावर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. यातच गर्भवती राहिल्याने तिने लग्नाचा अाग्रह धरला. त्याला तो टाळाटाळ करू लागल्यावर तिने ही बाब स्वत:च्या आई - वडिलांना सांगितली. त्यांना घेऊन ती त्याच्या घरी गेली. तेव्हा त्याच्या वडिलांनी (रायसिंग रूपलाल चव्हाण) जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हाकलून दिले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात संतोष त्याच्या वडिलांविरुद्ध भादंवि ३७६, ३२३, ५०४, ५०६ आणि अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी सुरू असताना तरुणीने बाळाला जन्म दिला.
 
नुकसानभरपाईचे आदेश
डीएनएअहवाल आल्यावर न्यायालयाने आरोपीला अत्याचारप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी, हजार रुपये दंड, जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल महिने सक्तमजुरी, हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली, तर रायसिंगला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने पीडिता आणि बाळासाठी लाख रुपये नुकसान भरपाईपोटी द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे. सहायक लोक अभियोक्ता अजित अंकुश यांनी साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता, डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली.
 
सुनावणी सुरू असताना
अतिरिक्तसत्र न्यायाधीश पी. एस. शिंदे यांच्यासमोर सुनावणी सुरू असताना आरोपी तसेच तरुणी आणि बाळाच्या रक्ताचे नमुने डीएनए चाचणीसाठी मुंबईतील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले. अहवालात संतोष हाच बाळाचा पिता असल्याचे स्पष्ट झाले.
बातम्या आणखी आहेत...