आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात सापडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल तलावात मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दीपक कैलास साळुंके (२३, रा. हरिओमनगर, जटवाडा परिसर) याचा मृतदेह सापडला. तो रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून तो बेपत्ता होता. हर्सूल पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढून घाटीच्या शवविच्छेदन विभागात दाखल केला. त्याचे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. पदवीधर असलेला दीपक पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याच्या हातावर मारहाण केल्याचे व्रण दिसत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
बातम्या आणखी आहेत...