आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलावातून मृतदेह काढण्याआधीच अग्निशमन दलाने मागितले पैसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तलावात मुलगा बुडाला. त्याचा मृतदेह तरी काढून द्या, अशी विनवणी करणाऱ्या मुलाच्या वडिलांना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या कामाचे पैसे कोण देणार? असा प्रश्न विचारून अमानवतेचे दर्शन घडवले. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सारोळा गावातील तलावात बुडून आकाश राजू वाघ (१७, रा. गणेशनगर गल्ली क्रमांक ७, मिसारवाडी) या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याचा मृतदेह तलावातून काढण्यात आला.
आकाशचे आई वडील मातीकाम करतात. वडिलांच्या मदतीसाठी त्याने चौथीतच शाळा सोडून दिली. सेंट्रिंग कामासाठी तो जायचा. मंगळवारी सायगाव येथील त्याचा भाचा दत्तू साकळकर हा औरंगाबादला आला होता. त्याला आकाशने सारोळा येथे फिरण्यासाठी नेले. सोबत मित्र विशाल वाघमारेही होता. साडेपाचच्या सुमारास तिघे जण सारोळा गावाला लागून असलेल्या तलावाकडे गेले. आकाशला पोहता येत नव्हते. तरीही तो तलावाच्या भिंतीवरून गुडघाभर पाण्यातून चालत गेला. काठावर उभ्या दत्तू आणि विशाललाही तो आत बोलवत होता. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. तो काही वेळात बाहेर येईल, तो मस्करी करतो आहे, असे काठावर थांबलेल्या दोघांना वाटले. मात्र पाच मिनिटे उलटूनही तो बाहेर आला नाही. दोघांना पोहता येत नव्हते. त्यांनी तात्काळ गावात जाऊन गावक ऱ्यांना माहिती दिली. गावकरी मदतसाठी धावले. त्यांनी पाण्यात आकाशला शोधले. पण तो सापडला नाही. फुलंब्री पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही शोध माेहीम राबवली. तरीही मृतदेह सापडला नाही. रात्र झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले.

काय आहे नियम ?
महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९६५ च्या कलम ४५७ मधील १२ प्रमाणे महापालिकेतील अग्निशामक यंत्रणेनेच आपत्कालीन सेवा द्यावी. ही सेवा घटना कळाल्यावर तत्काळ दिली पाहिजे. या संदर्भातील सर्वाधिकार अग्निशमन विभाग प्रमुखाला आहेत.

तालुक्यांत प्रशिक्षित कर्मचारी नाहीत
फुलंब्री तालुक्यात अग्निशमन आणि इतर कुठलीही आपत्कालीन यंत्रणा नाही. कुठलीही घटना घडल्यास औरंगाबाद मनपाच्या अग्निशमन विभागाला जावे लागते. अनेक तालुक्यांत अग्निशमन विभागाच्या गाड्या आहेत. मात्र प्रशिक्षित कर्मचारी नाही.

काय म्हणाले मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजीराव झनझन?
{ प्रश्न : आपल्याकडून आधी पैशांची मागणी झाली?
झनझन : पैसेमागितले नाही तर अग्निशमन विभागाला येणारा खर्च कोण करणार, स्वत: देणार आहे की ग्रामपंचायत देणार, एवढीच विचारणा केली.

{प्रश्न : आपत्तीत जीव वाचवणे हे आपल्या विभागाचे काम असताना आधी पैशांची विचारणा का केली?
झनझन : विभागीयआपत्ती निवारण केंद्राच्या नियमानुसार विभागाला आलेला खर्च संबंधिताने द्यायचा असतो. तो कोण देणार, एवढेच विचारले.

{प्रश्न : आधी मदत की पैशांची गरज?
झनझन : विभागालायापूर्वी आलेल्या खर्चाचे ३४ लाख रुपये का वसूल केले नाही, असे लेखापरीक्षण विभागाने विचारले आहे. पैसे मिळत नाही म्हणून अग्निशमन विभाग पोहोचला नाही, असे कधी झाले नाही. या वेळीही नाही.
दिव्य मराठीची मदत
बुधवारी मृतदेह काढण्यासाठी कोणीच पुढे येत नव्हते. अखेर आकाशच्या नातेवाईकांनी सकाळी साडेदहा वाजता ‘दिव्य मराठी’ला फोन केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, नायब तहसीलदार प्रवीण पांडे यांच्याशी संपर्क साधला. तसेच पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनीही तात्काळ या कुटुंबाला मदत देण्याचे आदेश दिले. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाझी झनझन यांनाही घटनेची कल्पना दिली. अवघ्या २० मिनिटांत सेव्हन हिल येथील अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी हजर झाली. एस. के भगत, वैभव वाकडे, सोमीनाथ भोसले, अशोक वेलदोडे, अब्दुल हमेद यांच्या पथकाने २० मिनिटांत आकाशचा मृतदेह बाहेर काढला. पोलिस पाटील राजू भोसले आणि गावकरी नामदेव भोसले यांनीही मदत केली. दुपारी चारच्या सुमारास आकाशच्या मृतदेहावर आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...