आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला निघालेल्या मिरवणुकीत डीजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेली मिरवणूक पाहण्यासाठी नारेगाव परिसरात आलेल्या तरुणाचा डीजेच्या वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी च्या सुमारास घडली. राहुल विजय थोरात (२६, रा. आनंद गाडेनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास नारेगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर मिरवणूक निघाली होती. राहुल मिरवणुकीतील डीजेच्या वाहनाशेजारी उभा होता. त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याला डीजेच्या वायरचा जबर धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक पी. डी. पचलुरे, डी. जी. शिंदे तपास करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...