आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरत्या कोंडवाड्याला आदळून युवकाचा करुण अंत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या फिरत्या कोंडवाड्याला आदळून सिल्लेखान्यातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तार भवनासमोर घडली. फैजान जाकेर कुरेशी (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. फैजान हा वडील भावाला व्यवसायात मदत करत होता. तो सकाळी तार भवनाच्या रस्त्याने रोशन गेटकडे दुचाकीवर जात होता. समोर महापालिकेचा फिरता कोंडवाडा (एमएच २० एजी ६४१२ ) जात होता. त्याच्या चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारा फैजान थेट कोंडवाड्याला जाऊन आदळला. घाटीत तपासून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. फैजानला दोन भाऊ असून तो लहान होता. क्रांती चौक ठाण्यात चालकाविरोधात कलम ३०४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला.

तरुणीला मारहाण करून सोनसाखळी लांबवली
लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीला मारहाण करत तिच्या गळ्यातील दहा हजार रुपये किमतीची सोनसाखळी लांबवल्याची घटना शुक्रवारी रात्री सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ घडली. हर्सूल सावंगी येथील पंकज दहिहंडे तरुणी एकमेकांना चांगले ओळखतात. सेव्हन हिल्स उड्डाणपुलाजवळ पंकजने या तरुणीला अडवून लग्नाची मागणी घातली. तिने नकार देताच मारहाण करून साखळी हिसकावून पसार झाला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.