आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला मृत्यूने वाटेतच गाठले, दुचाकीने भरधाव निघाल्याने झाला घात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - शहरातील एका महाविद्यालयात डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा म्हणून कंपनीतील काम आटोपून मित्राच्या दुचाकीने भरधाव घराकडे निघालेल्या तरुणाला वाटेतच मृत्यूने गाठले. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी घसरली. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला. संतोष सुभाष इंगळे (२१, मूळ रा.निल्लोड, ता. सिल्लोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

औद्योगिक वसाहतीतील एनआरबी बेअरिंग्ज लि. मध्ये संतोष अॅप्रेंटिस म्हणून काम करत होता. आयटीआयचे शिक्षण घेतलेल्या संतोषला पुढे डिप्लोमा करायचा होता. डिप्लोमाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याला शहरातील एका महाविद्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजता हजर व्हायचे होते. यासाठी त्याने कंपनीतील सहकारी मित्राची दुचाकी घेऊन तो आणि कैलास चव्हाण (२१, रा.बजाजनगर) मंगळवारी सकाळी ७.३५ वाजता शिफ्ट संपताच खोलीकडे भरधाव निघाले. स्नान करून त्याला शहरात जायचे होते. एनआरबी चौकात समोरून आलेल्या वृद्ध दुचाकीधारकास वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून संतोष दुचाकीसह दूरवर फरपटत गेला. कैलास बाजूला फेकला गेल्याने तो किरकोळ जखमी झाला. मात्र संतोषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

दुचाकीची दोघांना धडक : संतोषचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानंतर त्याची दुचाकी समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीवर धडकल्याने जयदीप भोसले कैलास गवारे (दोन्ही एनआरबी कामगार) किरकोळ जखमी झाले. गंभीर जखमी संतोषला कैलासने अन्य कामगारांच्या मदतीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी संतोषला घाटीत नेण्यास सांगितले. घाटीत दाखल करताच डॉक्टरांनी तपासून सकाळी वाजता संतोष यास मृत घोषित केले. मूळ गाव निल्लोड येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाळूज एमआयडीसीचे जमादार एस.पी.बहुरे तपास करत आहेत.

...तर त्याचे प्राण वाचले असते
संतोषच्याडोक्याला जबर मार लागून अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संतोषने हेल्मेट घातलेले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी चर्चा त्याच्या कंपनीतील सहकाऱ्यांत होती.
पुढे वाचा...
> गळफास घेऊन एकाची आत्महत्या
> तृतीयपंथीयाचा खून; दोघे अटकेत
बातम्या आणखी आहेत...