आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकवर दुचाकी आदळून तरुणाचा जागीच मृत्यू, बीड बायपासवर ३ दिवसांत आणखी एक अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाला. हा अपघात बीड बायपास रोडवरील गुरू लॉनसमोर रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडला. मोहन महादेव माळी (रा. श्रीकृष्णनगर, देवळाई) असे मृत तरुणाचे नाव अाहे.

मोहन याचे शहानूरमियाँ दर्गा परिसरात औषधी दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर तो मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला होता. रात्री कृष्णा शेळकेसोबत तो दुचाकीवर (एमएच २० ईबी ८८८८) परत येत होता. मोहन दुचाकी चालवत होता. गुरू लॉनसमोर त्याची दुचाकी ट्रकवर आदळली. कृष्णा मागच्या मागे पडला तर महेश पुढे पढला. मोहनच्या डोक्याला मार लागून तो बेशुद्ध पडला. कृष्णाही बेशुद्ध पडला होता. मात्र काही वेळाने शुद्ध आल्यानंतर त्याने मित्रांना फोन करून घटनेची माहिती दिली. काही मित्र तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दोघांनाही सिग्मामध्ये दाखल केले. रात्री दीडच्या सुमारास मोहनचा मृत्यू झाला. कृष्णाचा एक हात फ्रॅक्चर अाहे. मोहनने हेल्मेट घातले नव्हते. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहायक फौजदार आबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
अर्ध्या तासापूर्वीच होता भावाचा फोन
घटना घडण्याच्या अर्ध्या तासापूर्वी मोहनच्या मोठ्या भावाने त्याला फोन केला होता. अर्ध्या तासात घरी येतो असे त्याने सांगितले होते. मात्र त्याचा अपघात झाल्याचा दुसरा फोन गेल्याने माळी कुटुंबावर शोककळा पसरली. महेशचा साखरपुडा झाला होता. दिवाळीनंतर त्याचे लग्न होते.
बातम्या आणखी आहेत...