आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फीच्या नादात तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू, 10 दिवसात दुसरी घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मित्रांसोबत देवळाई तांडा येथील बाळापूर शिवारात फिरण्यासाठी गेलेल्या वीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा सेल्फी काढताना पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. सूरज भीमराव जेठे (२०, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे त्याचे नाव आहे.
 
बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर सूरजने पंडित नेहरू महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. कराटेमध्ये ब्लॅक बेल्टप्राप्त सूरज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देत होता. रविवारी तो मित्रांसोबत बाळापूर शिवारात फिरण्यासाठी गेला. मित्र पाेहत असताना तो सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. तोल जाऊन तो पाण्यात पडला. सोबतच्या मित्रांनी तातडीने त्याला पाण्यातून बाहेर काढले. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्याला बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. आर. राठोड, के. बी. लुटे करत आहेत. 

१० दिवसांपूर्वीच मुकुंदवाडीतील तरुणाचा मृत्यू
दहादिवसांपूर्वीच मुकुंदवाडी परिसरातील एक तरुण फिरण्यासाठी गेला होता. याच तलावात पोहताना गाळात अडकून त्याचा मृत्यू झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...