आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण शेतक-याची औराळीत गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा - तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळ तसेच नापिकीमुळे कन्नड तालुक्यातील आैराळी गावातील तरुण शेतकरी निवृत्ती शंकर गायकवाड (३१) यांनी शनिवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

निवृत्तीचे वडील शंकर गायकवाड यांना कुळाची तीन एकर जमीन आहे. येथे तीन वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नव्हता. यंदा कापूस, मका लावला होता. परंतु दीड एकरात केवळ एक क्विंटल कापसाचे उत्पन्न झाले. त्यामुळे निवृत्ती काही दिवसांपासून बेचैन होते. याच नैराश्यातून त्यांनी शनिवारी राहत्या घरी उपरण्याच्या साह्याने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली.