आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी: वायरने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुकुंदवाडी भागातील महालक्ष्मी कॉलनी, ठाकरेनगर येथील २८ वर्षीय तरुणाने रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. योगेश अर्जुन ढोले असे या तरुणाचे नाव आहे.

योगेश हा इलेक्ट्रिशियनचे काम करीत होता. महालक्ष्मी सणानिमित्ताने घरातील सगळे सदस्य बाहेर गेले होते. तो एकटाच घरात होता. इलेक्ट्रिक वायर त्याने छताच्या हुकाला बांधून त्याने गळफास घेतला. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याला एक भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. रविवारी योगेशही महालक्ष्मी दर्शनासाठी नातेवाइकांकडे गेला होता. मात्र तो सर्वांच्या आधी घरी परतला होता. साडेअकराच्या दरम्यान त्याचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी कुठलीही चिठ्ठ मिळाली नाही. त्यामुळे योगेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.