आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम आदमी पार्टी’मध्ये महिलांना मिळणार विशेष प्राधान्य, राजकारणात येऊ इच्छिणार्‍या स्त्रियांना संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिल्ली विधानसभेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. राजकारणात येण्यासाठी इच्छुक असणार्‍या महिलांना पार्टीत प्राधान्य देण्यात येणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ने सहा महिलांना संधी दिली होती. त्यातील तिघी जणी आमदारपदी विराजमान झाल्या. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 व लोकसभेच्या 48 जागा आहेत. याचा विचार करून महिलांना सर्वाधिक उमेदवारी देण्याचा ‘आप’ने निर्धार केला आहे. महिलांना 33 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचे पक्षातर्फे ठरवण्यात आल्याचे पार्टीचे सचिव हरमितसिंग व अँड. लक्ष्मण पाटील प्रधान यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
गुणवत्तेनुसार उमेदवारी
राजकारणी कुटुंबातील महिलांनाच उमेदवारी न देता ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि चारित्र्यवान महिलांना संधी मिळणार असल्याचे हरमितसिंग म्हणाले.
एक हजार तरुण प्रवेशासाठी इच्छुक
दिल्लीचा गड काबीज केल्यानंतर ‘आप’ महाराष्ट्रातही निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त 10 डिसेंबरला ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झाले. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातून एक हजार तरुणांनी आम आदमीत प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केली. 45 जणांनी ऑनलाइन अर्ज भरला असल्याची माहिती हरमितसिंग यांनी दिली.
सुगीचे दिवस
आम आदमी पार्टी 33 टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवारी देणार असल्याने राजकारणात महिलांना सुगीचे दिवस येणार आहेत. तेव्हा महिलांनी सर्वगुण संपन्न होण्यावर भर देण्याची गरज आहे. अँड. लक्ष्मण प्रधान पाटील, आम आदमी पार्टी.