आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणाचा निर्घृण खून: पाच जणांना सुनावली जन्मठेप, रक्ताचे डाग ठरले निर्णायक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सेंट्रिंगच्या कामाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या २५ वर्षीय तरुणावर कुऱ्हाड आणि चाकूने वार करून निर्घृण खून करणाऱ्या पाच जणांना सत्र न्यायाधीश आर.आर. काकाणी यांनी दोषी ठरवून जन्मठेप आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड ठोठावला. आरोपींच्या कपड्यांवर उडालेल्या मृताच्या रक्तासंबंधी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिलेला अहवाल संबंधित खटल्यात निर्णायक ठरला आहे. सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी नऊ साक्षीदार तपासले.
मिसारवाडीतील खलील खान अामिर खान हा १२ सप्टेंबर २०११ रोजी शेख हसन शेख अमीन यांच्याकडे सेंट्रिंग कामाचे पैसे मागण्यास गेला होता. शेख हसन शेख अमीन, शेख नासेर ऊर्फ नसीर ऊर्फ चुन्नू शेख हसन (२५), शेख अश्फाक शेख हसन (३०), नईम खान महेमूद खान (२३) अमजद खान महेमूद खान (२०, सर्व रा. मिसारवाडी) यांनी त्यास ठार केले. तत्कालीन पोनि.मारुती डब्बेवाड यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

...आणि रक्तगट जुळला
खलीलखानच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या अंगावरील जखमा आणि रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले. पोलिसांनी तारेकऱ्यांकडून जप्त केलेल्या कुऱ्हाड, चाकू, लाठ्या-काठ्यांवरील रक्त आणि कपड्यांवरील रक्त हे मृताच्या रक्तगटाशी जुळल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला हाेता. न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरून जन्मठेप आणि प्रत्येकी हजार रुपये दंड, दंड भरल्यास तीन महिने सक्तमजुरी सुनावली.
बातम्या आणखी आहेत...