आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांजणगावात तरुणाचा खून, डुकरांनी मृतदेह कुरतडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगराजवळील नाल्यात २२ ते २५ वर्षीय अज्ञात तरुणाचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह सापडला. कुजण्याच्या अवस्थेतील मृतदेह डुकरे आणि किड्यांनी कुरतडला. दोन दिवसांपूर्वी या तरुणाचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
रांजणगाव ते एम सेक्टरदरम्यान छोट्या पुलाखालील नाल्यालगत रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास शौचासाठी गेलेल्या एका नागरिकाला काही डुकरे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे दिसले. त्याने ही माहिती गावकऱ्यांना तर गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. दुय्यम पोलिस निरीक्षक अशोक जहारवाल, फौजदार जौंधळे, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत शेळके, बाळासाहेब आंधळे, रामदास गाडेकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृत तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह सापडलेल्या नाल्याजवळील झुडपांवर तसेच मातीवर रक्ताचे डाग आढळून आले. ‘रामू यशवंत’ नावाचा डबा आढळला : मृतदेहापासूनचार फूट अंतरावर झुडपात एक डबा आढळून आला. रामू यशवंत असे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जहारवाल यांनी दिली. मृतदेह आढळल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या दुकानांवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीच्या रेकॉर्डिंगवर खुन्यांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
बातम्या आणखी आहेत...