आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला बलात्कार, नगरसेविका सविता बोर्डेंसह सहा जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या विरोधात बुधवारी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीचे नातेवाईक दाद मागण्यासाठी गेले असता, लग्न करायचे असल्यास फ्लॅट, पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करणाऱ्या मुलाच्या नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. योगेश विठ्ठल बोर्डे असे आरोपीचे नाव आहे. तक्रारीत एमआयएमच्या नगरसेविका सविता बोर्डे आणि त्यांचे पती अरुण बोर्डे, शैलेश वाकळे, अशोक बोर्डे, सुधा बोर्डे, नंदा बोर्डे, रुक्मिणीबाई बोर्डे (सर्व रा. क्रांतीनगर) यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी दिली.
एकनाथनगरातील २० वर्षीय तरुणी एका विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
१८ डिसेंबर २०१२ रोजी उस्मानपुरा येथील एका शाळेत तिची योगेश बोर्डे याच्याशी ओळख झाली. योगेशने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवले. जानेवारी २०१३ मध्ये योगेशने तिला स्वत:च्या घरी आणि त्यानंतर पडेगाव येथील तारांगण हाऊसिंग सोसायटीतील मित्र शैलेश वाकळे आणि सारंग आंधळे यांच्या खोलीवर नेऊन अत्याचार केला. नंतर योगेशने तिला दशमेशनगरातील एका खासगी रुग्णालयात नेले. या वेळी योगेशची चुलत वहिनी संगीता बोर्डे या सोबत होत्या, असे या तक्रारीत म्हटले आहे.

योगेशची टाळाटाळ
पीडितमुलगी वारंवार योगेशला लग्नाचे विचारत होती. मात्र योगेश तिला टाळायचा. काही वेळा तिला मारहाणही केली. काही महिन्यांपूर्वी योगेशने आपणास पुण्याला नेऊन साेडण्याचाही प्रयत्न केला, असेही तक्रारीत म्हटले आहे. एपीआय अर्जुन पवार तपास करत आहेत.