आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरील टाकलेल्या त्या पोस्टमुळे वाचले तरुणाचे प्राण; त्यानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मंठा येथील एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ही पोस्ट वाचून औरंगाबादमधील अॅडव्होकेट स्वाती नखाते यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाचे नाव सचिन काळे पाटील असे आहे. नखाते यांनी वेळीच पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्याने सचिनचे प्राण वाचले.
 
मराठा क्रांती मोर्चामुळे सचिन आणि स्वाती यांची भेट झाली होती. यानंतर त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. सचिनने रविवारी आत्महत्या करणार असल्याची पोस्ट टाकली होती. रात्री 8 वाजता आत्महत्या करणार असल्याचे त्याने म्हटले होते. नखाते यांनी त्यांची पोस्ट पाहताच पोलिसांना त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नखाते यांनी फेसबुकवरील पोस्टच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सचिनच्या फेसबुक वॉलवरुन पोस्ट हटवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...