आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात अपयश; तरुणाची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रेमात अपयश आल्यामुळे दौलताबाद माळीवाडा येथील अमोल अशोक वाहूळ (२०) या युवकाने आत्महत्या केली. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी दौलताबाद ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अमोलच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अमोलच्या प्रेयसीचे वडील आणि काकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
माळीवाडा केडीआर फार्म येथे अमोल राहत होता. त्याचे वडील मोलमजुरी करतात. दोन वर्षांपूर्वी ११ वीत असताना सिडकोतील पल्लवी (नाव बदलले आहे) नावाच्या मुलीवर अमोलचे प्रेम जडले. दोघांची मैत्री झाली. त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, हे पल्लवीच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांनी अमोलविरुद्ध पल्लवीवर जबरदस्ती आणि छेडछाड केल्याची तक्रार दिल्यावरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आपण प्रेमात यशस्वी होणार म्हणून त्याने आत्महत्या केली.
मात्र, मरण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सिडको ठाण्यातील दोन कर्मचारी मुलीच्या वडिलांचे काकांचे नाव आहे. आत्महत्येनंतर मृतदेह घाटीत आणला असता त्याच्या शर्टच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. या दोघांविरोधात दौलताबाद ठाण्यात मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक तडसे करीत आहेत.