आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तरुणांनी फाेडली वाहतूक कोंडी, सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत केले वाहतूक नियमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोंढा नाका उड्डाणपुलाखालील रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याने आकाशवाणी व सेव्हन हिल्सकडे जाण्यासाठी बुधवारी जालना रोडवरील वाहतूक काल्डा कॉर्नर, सावरकर चौक आणि अभिनय टाॅकीज, जुना मोंढा, कैलासनगरमार्गे वळवली होती.

{बहुतांश चालकांनी काल्डा कॉर्नरऐवजी जुना मोंढा चौक, कैलासनगर रस्त्याकडे वाहने वळवली. जेमतेम ४० फूट रुंदीच्या या रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती.

{स्मशान मारुतीसमोर अरुंद रस्त्यावर तर अनेक दुचाकी चालक चुकीच्या बाजूने घुसत होते. चारचाकींना पुढे जाण्यापासून रोखत होते. वाहतूक पोलिस फक्त मोंढा नाका चौकातच तैनात होते.
रस्त्यावर उतरून शिस्त लावली
कोंडीच्या वेळी नितीन गवळी, शुभम नागकीर्ती, सुजित पंढेरे हे युवक मदतीला धावले. त्यांनी स्मशान मारुती मंदिराकडून जालना रोडकडे जाणाऱ्या वाहतुकीचे सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत नियमन केले. त्यामुळे वाहनचालकांना कोंडीतून सुखरूपपणे बाहेर पडता आले.