आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, तक्रारीची दखल घेत नसल्‍याने उचलले पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जमिनीच्या व्यवसायातील भागीदारांकडून खंडणीची मागणी होत असल्याची तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने एका तरुणाने पोलिस आयुक्तालयात गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हनीफ चुन्नू शेख (३२, रा. आसेफिया कॉलनी) असे त्याचे नाव आहे. हनीफला मागील काही महिन्यांपासून कैसर मुन्ना नामक व्यक्ती पैशासाठी त्रास देत होते. दोघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. परंतु कारवाई होत नसल्याने त्याने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार करण्यासाठी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास आयुक्तालय गाठले. तेथे विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी हनीफला घाटीत दाखल केले. 
बातम्या आणखी आहेत...