आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणाचा अपघाती मृत्यू, दोन महिन्यांपूर्वी झाले हाेते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वडिलांना कंपनीच्या गाडीत सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी आंबेडकर चौकाजवळील सनी सेंटरसमोर घडली. नरेंद्र कामेश्वर आगळे (२६, रा. जयहिंद कॉलनी, पिसादेवी) असे मृताचे नाव आहे. नरेंद्र हा नारेगाव परिसरातील एका कंपनीत मशीन ऑपरेटर होता, तर त्याचे वडील दुसऱ्या कंपनीत कामाला होते. रोज सकाळी सहा वाजता आंबेडकर चौकात कंपनीची बस त्यांना घेण्यासाठी येते. सोमवारी तो एमएच २० डीएन ९०७२ या दुचाकीवरून वडिलांना चौकात सोडण्यास आला. घरी परतत असताना पळशी तांडा येथील एक १६ वर्षांचा मुलगा एमएच २० सीजे ८०२९ या दुचाकीवरून भरधाव आंबेडकर चौकाकडे येत होता.
दोन्ही दुचाकींची धडक झाली आणि यात नरेंद्र खाली पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला तत्काळ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दोन महिन्यांपूर्वीच नरेंद्रचे लग्न झाले हाेते. या दोघांनीही घटनेच्या वेळी हेल्मेट घातलेले नव्हते. नरेंद्रच्या भाऊजीने सिडको ठाण्यात तक्रार दिली असून उपनिरीक्षक अंबादास मोरे तपास करत आहेत. अपघाताचा प्रसंग या रोडवरील एका दुकानातील सीसीटीव्हीने टिपला आहे. नरेंद्रला एक भाऊ आणि एक बहीण आहे. '

पुढे वाचा... मनपा कामगाराचा अात्महत्येचा प्रयत्न
बातम्या आणखी आहेत...