आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हौदात पडलेल्या 'त्या' युवकाचा अपघाती मृत्यू नव्हे खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील गदाना येथील एका युवकाचा घरातील पाण्याचा हौदात पडून संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३१ डिसेंबर) घडली. आकाश देविदास लाटे (१७) असे त्या तरुणाचे नाव आहे. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती पुराव्यांवरून हा खून असल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रकरणाची चौकशीची दिशा बदलत खुलताबाद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.बुधवारी सायंकाळी सहा वाजता घरातील पाण्याच्या हौदात पडून आकाशचा मृत्यू झाला.
कापूस वेचून सायंकाळी घरी परतलेल्या आजीने हा प्रकार पाहून तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार विभागीय पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पूरभे यांनी गदाना येथे धाव घेतली.